रस्ते दुरुस्त करा… उगाच मला शिव्या पडतात ; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचं राज्य सरकारला अल्टिमेटम

222
Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी खुशखबर! इंधनाचा दर होणार स्वस्त ; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी खुशखबर! इंधनाचा दर होणार स्वस्त ; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज्य सरकारला नोटीस पाठवणार आहेत. तसे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मुंबई-पुणे, कल्याण- नगरच्या दुरवस्थेवरुन गडकरींनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तीन महिन्यांत रस्ते दुरुस्त करा, अन्यथा ते रस्ते ताब्यात घेतो. असा अल्टिमेटम गडकरींनी दिला आहे. रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. पण शिव्या मला पडतात, असं गडकरी पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Versova-Madh Bridge : वर्सोवा ते मढ दरम्यान केबल स्टे आधारित पूल, आता दीड तासांऐवजी केवळ २० मिनिटांमध्ये होणार प्रवास)

जुना मुंबई-पुणे हायवे आणि कल्याण नगर रस्त्याप्रकरणी नोटीस पाठवण्याचे आदेश नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) दिले आहेत. रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर करार रद्द करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र सरकारनं आमच्याकडून दोन रस्ते घेतले आहेत. एनएच ४ (NH 4) या रस्त्यावर खूप अपघात होतात. ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते, तेव्हा करंदीकर साहेब व्यवस्थापकीय संचालक होते. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी ते माझ्याकडे आले होते. मुंबई-पुणे रस्ता हा नुकसानीत आहे, कर्ज वाढलेलं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. यातून मार्ग काढण्यासाठी मला पवार साहेबांनी तुमच्याकडे पाठवल्याचं करंदीकरांनी मला सांगितलं,’ असा किस्सा गडकरींनी सांगितला. (Nitin Gadkari)

नितीन गडकरी काय म्हणाले ?

‘करंदीकर माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी मंत्री नव्हतो. मी हीच बाब त्यांना सांगितली. ज्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या आता काय करायचं ते असं मी करंदीकरांना म्हटलं. यानंतर शरद पवारांचा मला फोन आला. म्हणाले, ‘नितीन, राज्यातलं सरकार जरी बदललं असलं तरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हे तुझं अपत्य आहे आणि त्यासाठीचा उपाय तूच काढला पाहिजे.’ असं गडकरी म्हणाले.

(हेही वाचा – PM Modi and Mohammad Yunus यांच्यात अमेरिकेत बैठक नाहीच)

‘त्यानंतर मी जुना मुंबई-पुणे हायवे (Mumbai-Pune Highway) एमएसआरडीसीला (MRDC) हस्तांतरित केला. त्या करारातील अटी अशी होत्या की या रस्त्यावरील सगळे पूल त्यांनी बांधले पाहिजे. सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण आता त्यांनी हा रस्ता ८ हजार कोटी रुपयांत विकून टाकला, पैसे घेतले. पण त्या रस्त्यावर ते कामच करत नाहीत. त्यामुळे तिथले आमदार आता तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात,’ अशा शब्दांत गडकरींनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.