भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
संघ मुख्यालयात ध्वजारोहण उत्साहात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील मोहिते वाडा येथे आज, बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ता ध्वजारोहण करण्यात आले. महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधताना लोया म्हणाले की, आपण स्वीकारलेल्या गणतंत्राच्या अनुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवे, याचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीवीर जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते त्यांची देखील आठवण आजच्या दिवशी करावी, असे ते म्हणाले. देशाला प्रगतीच्या वाटेवर सर्व घेऊन जाण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात ”म्हाडा”चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, ”म्हाडा”चे मुख्य अभियंता-१ धिरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, विधी सल्लागार पी.बी. वीर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी विकास रसाळ, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community