Flamingo Bird: एनआरआय कॉलनी नजीकच्या फ्लेमिंगो स्पॉटवर विशेष स्वच्छता मोहीम

227
Flamingo Bird: एनआरआय कॉलनी नजीकच्या फ्लेमिंगो स्पॉटवर विशेष स्वच्छता मोहीम

५ जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या (5 th June World Environment Day) पार्श्वभूमीवर बेलापूर (Belapur) येथील विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिका आणि रोटरी क्लब (Rotary Club) तसेच डॉ.डि.वाय.पाटील महाविद्यालय (Dr. DY Patil College) यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर ५४, (Belapur Sector 54) बेलापूर येथे एनआरआय कॉलनीजवळील दिल्ली पब्लिक स्कुल नजीकच्या फ्लेमिंगो स्पॉट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Flamingo Bird)

नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे (Commissioner Dr. Kailas Shinde) यांच्या निर्देशानुसार ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत शनिवारी फ्लेमिंगोंचा वावर असलेल्या पाणथळ क्षेत्र व त्या नजीकच्या परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा जमा करुन परिसर स्वच्छ करण्याची विशेष मोहीम बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आली होती.

(हेही वाचा – Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?)

यावेळी राजलक्ष्मी विजय पाटील यांच्यासह अनेकांनी उपस्थित पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांच्यासोबत उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा अभियानाची’ सामुहिक शपथ ग्रहण केले. (Flamingo Bird)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.