Flight Ticket: दिवाळीच्या तोंडावर विमान प्रवास झाला स्वस्त! वाचा तिकीटांचे दर काय?

309
Flight Ticket: दिवाळीच्या तोंडावर विमान प्रवास झाला स्वस्त! वाचा तिकीटांचे दर काय?
Flight Ticket: दिवाळीच्या तोंडावर विमान प्रवास झाला स्वस्त! वाचा तिकीटांचे दर काय?

दिवाळीनिमित्त विमानप्रवासासाची तिकिटे (Flight Ticket) गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत. इग्झीगो या ट्रॅव्हल पोर्टलच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत विमानप्रवास यावर्षी २० ते २५ टक्के स्वस्त झाला आहे. एकदिशा प्रवासासाठी ३० दिवस आधी आरक्षण केल्यास विमानाचे तिकीट स्वस्त मिळत आहे. एकाचवेळी प्रवासी वाहून नेण्याची वाढलेली क्षमता आणि हवाई इंधनाचे घसरलेले दर विमान प्रवास स्वस्त होण्यामागे मुख्य कारण असु शकते. (Flight Ticket)

(हेही वाचा-NMMT बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत)

मागीलवर्षी विमानांची संख्या आणि प्रत्येक हवाईमार्गावर उपलब्ध असलेल्या विमानांतील मर्यादित आसनक्षमता यांमुळे प्रवासभाड्यात वाढ झाली होती. त्यातच गो फर्स्ट या विमानकंपनीची उड्डाणे स्थगित करण्यात आल्यामुळे अन्य कंपन्यांवर त्या प्रवाशांचा भार पडला आणि त्यामुळे ही भाडेवाढ झाली. यावर्षी विमानांची संख्या आणि आसनक्षमता यांत वाढ झाल्यामुळे तसेच हवाई इंधनाचा दर १५ टक्के कमी झाल्यामुळे सरासरी प्रवासभाडे घटले आहे, असे इग्झिगो समूहाचे सीईओ आलोक बाजपेयी यांचे मत आहे. (Flight Ticket)

(हेही वाचा-Baba Siddique यांना अखेरचा निरोप; भर पावसात झाला दफनविधी)

बेंगळुरू-कोलकाता या विमानप्रवासाचे भाडे सर्वाधिक ३८ टक्के स्वस्त झाले आहे. गेल्यावर्षी दिवाळीनिमित्त या हवाई मार्गासाठी माणशी १०,१९५ रुपये द्यावे लागले होते. यंदा हे भाडे ६,३१९ रुपये आहे. चेन्नईहून कोलकाता येथे जाणाऱ्या विमानासाठीचे तिकीट ८,७२५ रुपयांवरून ३६ टक्के कमी होत सरासरी ५,६०४ रुपयांवर आले आहे. मुंबई ते दिल्ली विमानप्रवास यंदा ३४ टक्के स्वस्त झाला आहे, तर दिल्ली ते उदयपूर प्रवासही ३४ टक्के स्वस्त झाला आहे. दिल्ली ते कोलकाता, हैदराबाद ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर विमानप्रवास ३२ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. (Flight Ticket)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.