- ऋजुता लुकतुके
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर काही मिनिटांतच दिल्लीहून निघालेलं विमान अयोध्येला पोहोचलं.
अयोध्येत राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन होत आहे, त्याचवेळी तिथे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचंही (Maharishi Valmiki International Airport) उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते पार पडलं आहे. धार्मिक यात्रा पर्यटनाच्या नकाशावर अयोध्या हे मोठं शहर असेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्गाटनाच्या वेळी दिली आहे.
उद्गाटनानंतर पहिलं विमान अयोध्या विमानतळावर उतरलं ते होतं इंडिगो कंपनीचं (IndiGo) दिल्ली ते अयोध्या विमान. या विमानाचे कप्तान आशुतोष शेखर यांनी प्रवाशांचं विमानात स्वागत केलं. तो क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानाचा प्रवास अयोध्येला थांबण्यापूर्वी आशुतोष यांनी काही सेकंदं प्रवाशांशी संपर्क साधला.
आणि त्यांच्या छोटेखानी भाषणाचा शेवट त्यांनी केला तो ‘जय श्रीराम’ या घोषाने.
#WATCH | IndiGo pilot captain Ashutosh Shekhar welcomes passengers as the first flight takes off from Delhi for the newly constructed Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham, in Ayodhya, UP. pic.twitter.com/rWkLSUcPVF
— ANI (@ANI) December 30, 2023
बंगळुरू आणि कोलकात्याहून आठवड्याला २१ विमान फेऱ्या अयोध्येला
एनडीटीव्ही वृत्त वाहिनीवरील एका रिपोर्टनुसार, प्रवाशांनी दिल्लीहून विमान निघण्यापूर्वी केक कापला आणि विमानात भगवे झेंडे घेऊनच प्रवासी आले होते. नवीन उद्घाटन झालेलं अयोध्या विमानतळ शहरापासून १५ किलोमीटर लांब आहे. आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचा खर्च १,४५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
या विमानतळाच्या उद्घाटनानंतर भारतातील प्रमुख विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी नवीन विमान उड्डाणांची घोषणाही केली आहे. इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरुवातीला नवी दिल्ली आणि मुंबईहून असणार आहे. तर एअर इंडियानेही आपल्या दोन विमान फेऱ्यांची घोषणा केली आहे.
बंगळुरू आणि कोलकात्याहून आठवड्याला २१ विमान फेऱ्या अयोध्येला होणार आहेत. त्यामुळे बंगळुरू आणि कोलकाता ही दोन महानगरंही अयोध्येला हवाई मार्गाने जोडली जातील. १७ जानेवारीपासून या फेऱ्या सुरू होणार असून त्यांचं बुकिंग सुरू झालंय. कंपनीची दिल्ली ते अयोध्या विमान फेरी शनिवारपासूनच सुरू झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community