ऑनलाइन ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमध्ये (Flipkart Cost Cutting) पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. यावर्षीही कामगिरीच्या आधारे वॉलमार्टच्या मालकीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या किमान ५ ते ७ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टद्वारे करण्यात येत असलेली ही कारवाई मार्च ते एप्रिल दरम्यान पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मेंसच्या आधारे सातत्याने कामावरून काढत आहे. कंपनीने वार्षिक परफॉर्मेंस आढाव्याच्या आधारे कपतीची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अंदाजे 1500 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा )
गेल्या वर्षभरापासून फ्लिपकार्टने नवीन नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत. सध्या कंपनीत सुमारे २२ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीने ७ टक्के कामावरून काढून टाकल्यास सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म गेल्या काही काळापासून खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कंपनीने कर्मचारी कपतीचा मार्ग स्वीकारला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community