Flood In Indonesia: इंडोनेशियामध्ये पावसाचा हाहाकार! थंड लाव्हामुळे ३७ जणांचा मृत्यू

175
Flood In Indonesia: इंडोनेशियामध्ये पावसाचा हाहाकार! थंड लाव्हामुळे ३७ जणांचा मृत्यू
Flood In Indonesia: इंडोनेशियामध्ये पावसाचा हाहाकार! थंड लाव्हामुळे ३७ जणांचा मृत्यू

इंडोनेशियातील (Flood In Indonesia) सुमात्रा बेटावर मुसळधार पाऊस, ज्वालामुखीचा थंड लावा आणि चिखलाच्या प्रवाहामुळे कहर झाला आहे. यामुळे बेटावर अचानक पूर आला. किमान 37 लोक मरण पावले असुन अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. पाऊस आणि माऊंट मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठी भूस्खलन झाली आहे. शनिवारी (११ मे) मध्यरात्रीपूर्वीचं नदीला पूर आला. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. (Flood In Indonesia)

चार जिल्ह्यांतील गावं उद्ध्वस्त

पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांतील गावं उद्ध्वस्त झाली आहेत. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरात अनेक लोकं वाहून गेले आहेत. शंभरहून अधिक घरं आणि इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी आगम जिल्ह्यातील कांडुआंग या गावातून १९ मृतदेह आणि तनाह दातार या शेजारील जिल्ह्यातून आणखी नऊ मृतदेह बाहेर काढले होते. पडांग परियमनमधील पुरादरम्यान आठ मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. तर एक मृतदेह पडंग पंजांग शहरात सापडला (People Killed Due To Cold Lava) होता. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता असलेल्या १८ लोकांचा शोध घेत आहेत. (Flood In Indonesia)

अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन

पश्चिम सुमात्रामधील (Indonesia) पेसिसिर सेलाटन आणि पडांग परियामन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं होतं. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर ही आपत्ती आली आहे. मागील वर्षी माऊंट मारापीमध्ये स्फोट झाला होता. त्यामध्ये २३ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्तींच्या केंद्रानुसार, २०११ पासून ज्वालामुखी चार सतर्क पातळींपैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या उद्रेकापासून मरापी ज्वालामुखी सक्रिय आहे. इंडोनेशियातील १२० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखींपैकी हा एक आहे. (Flood In Indonesia)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.