सांगलीत पुराचा धोका: कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ,नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

संततधार पुरामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच शुक्रवारी कोयनेतून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लाॅट आदी भागातली नागरिकांना स्पीकरवरुन स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरु करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरुन दिल्या जात आहेत. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅटसह सिद्धार्थ परिसर, मगरमच्छ काॅलनी परिसरातील नदीकाठच्या भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

( हेही वाचा: पुणे- मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद )

कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने, पुर्वनियोजनानुसार, शुक्रवारी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 10 फूट 6 इंच उघडून 800 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्यूसेक विसर्ग सुरु राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here