Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला; महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले

188

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. अनेकांचा मृत्यू झाला, हजारपेक्षा जास्त जखमी झाले. 174 जिल्ह्यातील हजारो घरे पाण्यात गेली आहेत. 10 हजार पेक्षा जास्त प्राण्याचा मृत्यू झाला आणि ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकं पाण्यात आणि लाखो संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

पंजाबमधील परिस्थिती काही वेगळी नाही. अनेक ठिकाणी पूर आला. येथील बंसत नगरमध्येही अनेकजण अडकले होते. त्याचवेळी भारताचा हॉकी खेळाडू धावून आला. एनडीआरएफ पथक पोहचण्यापूर्वीच जुगराज सिंह पूरात अडकलेल्यांच्या मदतीला धावून आला. जुगराज सिंह आणि त्याच्या साथीदारांनी आतापर्यंत 150 जणांना वाचवलेय. जुगराज सिंह याने मंगळवारी 70 जणांना वाचवले. बसंत नगरमध्ये पूरात अडकलेल्यांसाठी जुगराज सिंह देवदूतासारखा धावून आला.

(हेही वाचा Veer Savarkar : सावरकर माझ्या जीवनात आल्याने जगणेच बदलले – रणदीप हुड्डा)

देशासाठी कर्तव्य करणारा जुगराज सिंह पुरामध्ये अडकलेल्यांच्या मदतीला धावून आला. एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळाला पोहचण्यासाठी उशीर झाला. त्यांची वाट न पाहाता जुगराज सिंह याने रोपरच्या मदतीने स्थानिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले. एनडीआरएफ पथक पोहचण्यापूर्वी जुगराज आणि त्याच्या टीमचे सदस्य आणि प्रशिक्षक बचावासाठी मैदानात उतरले.रोपरच्या मदतीने त्यांनी 70 जणांना सुरक्षित बाहेर काढले. सोमवारी 10 जुलै रोजीही जुगराज सिंह याने 80 जणांना वाचवले होते

कोण आहे जुगराज सिंह?

जुगराज सिंह याने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅनो फेडरेशन 2023(ICF) विश्वचषक स्पर्धेत कास्यंपदक पटकावले होते. गुरदासपूरमधील अदलापूर गावात राहणारा जुगराज पंजाब क्रीडा विभागातर्फे रोपरमधील कटली येथे चालवण्यात येणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जून महिन्यात झिगुई, यिचांग आणि हुबेई, चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅनो फेडरेशन 2023 ICF ड्रॅगन बोट विश्वचषक स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. कर्नाटकमध्ये नुकतेच झालेल्या IKCA ड्रॅगन बोट राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले होते. जुगराज आता सरकारी कॉलेज, रोपरमधून एमए पंजाबी करत आहे. कटली येथील कयाकिंग कॅनोइंग कोचिंग सेंटरचे प्रशिक्षक जगजीवन सिंग यांनी सांगितले की, तो १० खेळाडू आणि दोन हॉकी प्रशिक्षकांचा संघ असून त्यांनी बचाव कार्य केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.