उन्हाचा कडाखा वाढला असल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे शहर बाजारात (City Market) फुलांचे दर (Flowers Price) वाढलेले आहेत. सध्या सणांचा काळ सुरु असून लग्नसराईही आहे. परंतु फुलांची आवक याकाळात कमीच असल्याने अस्सल फुलांच्याजागी काही प्रमाणात प्लास्टिकच्या फुले (Plastic flowers) अन् पुदिन्याच्या हारांनी ही कसर भरून काढली आहे.
(हेही वाचा – Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा)
ऐन लग्नाच्या सीझनमध्ये फुलांच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या (Summer) कडाक्यामुळे फुलबागांना हवे तितके पाणी मिळत नाही. फुलांची आवक कमी झाली आहे आणि लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात फुलांची मागणी वाढते. ज्यामुळे दरात वाढ होते. गुलाब (Rose) आणि इतर फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी १०० ते १५० रुपये किलो असलेला गुलाब (Rose) आता २०० रुपये किलोने विकला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community