मुंबईतील उद्योजक परवेज दमानिया आणि अश्विन अडसूळ डायरेक्टर असलेल्या अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्या वतीने कराड विमानतळावर फ्लाईंग स्कूलचा (वैमानिक प्रशिक्षण) औपचारिक प्रारंभ झाला आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर विमानतळावर सुविधा उपलब्ध केल्या. आता प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. 20 मुलांची पहिली बॅच प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. प्रशिक्षणासाठीची विमाने सात महिन्यापूर्वी विमानतळावर दाखल झाली होती. दोन विमाने दोन सीटर तर दोन विमाने चार सीटर आहेत.
(हेही वाचा Terrorist : पुण्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर; ‘आयसिस’चा अड्डा उद्ध्वस्त)
कराड विमानतळावर प्रशिक्षणासाठी आलेल्या विमानांच्या पार्किंग आणि मेन्टेनन्ससाठी एअरक्राफ्ट हँगरची उभारणी करण्यात आली आहे. फ्लाईंग स्कूल सुरू होणे, ही कराडसाठी चांगली बाब आहे हे स्कूल लोकप्रिय होईल, असा विश्वास परवेज दमानिया यांनी व्यक्त केला. दरम्यान, कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण केले जाणार आहे.
देशभरातील सुमारे 50 विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा कालावधी दोन वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे डायरेक्टर परवेझ दमानिया, अश्विन अडसूळ, फ्लाईंग क्लबचे बेस इन्चार्ज पंकज उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community