Bridge : मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; नागरिकांचे हाल सुरूच

15 फेब्रुवारीपर्यंत हा पूल सुरू होईल अशी चर्चा होती, मात्र तेव्हाही या पुलाचे लोकार्पण झालेच नाही. अखेरीस आता या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हट्ट सरकारने धरला आहे, असे समजते.

257

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास सुरळीत करणारा उड्डाणपूल बांधून तयार आहे. मात्र त्याचे उद्घाटन सरकारी कारभारामुळे रखडले आहे. हा पूल विमानतळ परिसर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यानची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हट्ट सरकारने धरला असल्याचे समजते. त्यामुळे हा पूल तयार असूनही सुरु करण्यात आला नाही. परिणामी नागरिकांना अजूनही येथील प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

790-मीटर-लांब हा उड्डाणपूल (Bridge) वाहनचालकांना विमानतळ टर्मिनलच्या बाहेर विलेपार्ले ट्रॅफिक सिग्नलला बायपास करण्यास मदत करेल. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील हा उड्डाणपूल काही विविध कामे वगळता जवळपास पूर्ण झाला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत हा पूल सुरू होईल अशी चर्चा होती, मात्र तेव्हाही या पुलाचे लोकार्पण झालेच नाही. अखेरीस आता या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हट्ट सरकारने धरला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी ते मुंबईतील कोस्टल रोडचे लोकार्पण करणार आहेत. तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचेही लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Manohar Joshi : हिंदुत्वाच्या आधारे मते मागितल्याने मनोहर जोशींना १९९१ मध्ये सोडावी लागलेली आमदारकी)

पूल तयार पण…

या उड्डाणपुलाचे (Bridge) बांधकाम जून 2021 मध्ये 48.43 कोटी रुपयांच्या खर्चाने सुरू झाले होते. हा पूल बांधून तयार झाला तरी केवळ उद्घाटन कधी करायचे यावरच निर्णय होत नसल्याने हा पूल वापरण्यापासून नागरिक वंचित राहिले आहेत. परिणामी त्यांना विमानतळ परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सध्या, टर्मिनल 2 मधून बाहेर पडणारे आणि सहार एलिव्हेटेड ऍक्सेस रोडने वांद्रे किंवा दक्षिण मुंबईकडे जाणारे वाहनचालक डोमेस्टिक एअरपोर्ट सिग्नलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे ते हा उड्डाणपूल (Bridge) कधी सुरु होणार याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत.

  • उड्डाणपुलाची किंमत: ₹48.43 कोटी
  • लांबी: 790 मीटर
  • काम सुरू झाले: जून २०२१
  • उघडणे अपेक्षित: 15 फेब्रुवारी

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.