F&O Expiry : राष्ट्रीय शेअर बाजाराने फ्युचर, ऑप्शनची कालबाह्यता बदलली

F&O Expiry : आता महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संपणार सौद्यांची मुदत.

66
F&O Expiry : राष्ट्रीय शेअर बाजाराने फ्युचर, ऑप्शनची कालबाह्यता बदलली
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात, एनएससीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेताना वायदे बाजारातील सौद्यांची पूर्तता करण्याची मुदत गुरुवारऐवजी सोमवारवर आणली आहे. ४ एप्रिलपासूनच हा बदल लागू होईल. महिन्याभरासाठी असलेले सौदे तसंच आठवड्याचे सौदेही आता गुरुवारी नाहीत तर सोमवारी पूर्ण होतील. फ्युचर आणि ऑप्शनमधील आठवड्याचे सौदे आता दर सोमवारी पूर्ण होतील. किंवा सोमवारपर्यंतची मुदत त्यासाठी असेल. तर महिनाभर, तीन महिने किंवा सहा महिन्यांसाठी असलेले सौदे त्या त्या महिन्यातील शेवटच्या सोमवारी पूर्ण करणं बंधनकारक असेल. याला एक्सपायरी किंवा कालबाह्यता दिवस असं म्हटलं जातं. रोख्यांबरोबरच निफ्टी, बँक निफ्टी, फिननिफ्टी अशा विविध निर्देशांकांसाठीही हे नियम लागू आहेत. ३ एप्रिल २०२५ पासून सध्याचे अपूर्ण सौदेही नवीन पूर्तता दिवसांत बदलतील. (F&O Expiry)

(हेही वाचा – भोकरदनमधील कैलास बोराडेंना मारहाण प्रकरणी ‘मकोका’ लावणार; DCM Eknath Shinde यांची घोषणा)

शेअर बाजारात फ्युचर व ऑपशन किंवा वायदे बाजार असा स्वतंत्र सौद्यांचा प्रकार आहे. एखाद्या महिन्यात विशिष्ट शेअर किंवा निर्देशांकातील खरेदी आणि विक्रीचा व्यवहार पूर्तता दिवस ठरवून केला जातो. त्याला वायदे बाजारातील सौदे असं म्हणतात. त्यासाठी एकूण खरेदीची किंमत भरावी लागत नाही. त्यातील काही रक्कम सुरुवातीला भरावी लागते आणि मुदतीपूर्वी विक्री केल्यास झालेल्या नफ्याची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होते. व्यवहाराची पूर्ण रक्कम त्यासाठी भरावी लागत नाही. नुकसान झाल्यास मात्र तेवढे पैसे कमी होतात. वायदे बाजार हा जोखमीचा मानला जातो. त्यामुळे गुंतवणुकदारांनी अभ्यासपूर्वक यात पैसे गुंतवावे असा सल्ला हिंदुस्थान पोस्ट देत आहे. (F&O Expiry)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणुकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरवर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.