पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी आणि वाहतूक पोलिस या सर्व घटकांना समाविष्ट करून ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केली.
(हेही वाचा – Atal Bihari Vajpayee हे Jawaharlal Nehru यांचे भक्त; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपाने व्यक्त केला संताप)
शहरातील वाहतूक काेंडीसह विविध प्रश्नांसंदर्भात पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित हाेते. शहरातील वाहतूक काेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी पुढील महिन्यात बैठक आयोजित केली जाणार आहे.
(हेही वाचा – Pakistani infiltrator killed : राजस्थानात पाकिस्तानी घुसखोर ठार; सीमा सुरक्षा दलाची कारवाई)
यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी, वाहतुक पोलिस आदी सर्व घटकांना समाविष्ट करून माेबिलिटी प्लॅन तयार केला जाणार आहे. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याच वेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावायच्या आहेत. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर यासंदर्भात जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढला जाईल, असे पवार (DCM Ajit Pawar) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community