बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळा; Navi Mumbai Municipal Corporation ने जारी केली मार्गदर्शिका

29
बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळा; Navi Mumbai Municipal Corporation ने जारी केली मार्गदर्शिका
बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळा; Navi Mumbai Municipal Corporation ने जारी केली मार्गदर्शिका

नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण (noise pollution), वायू प्रदूषण (Air pollution) व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहुन दाखल करून घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र.3 मध्ये उच्च न्यायालयाने  11‍ डिसेंबर 2023 या दिवशी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने “मानक कार्यप्रणाली” तयार करण्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या 24 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त 2 यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती.

(हेही वाचा – राजकीय पक्ष आमच्या आदेशाचा आदर करत नाहीत; बेकायदा होर्डिंग्जविषयी Bombay High Court ची नाराजी)

सदर समितीने विविध बैठका घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी धारकांनी विकासकांनी / कंत्राटदारानी अवलंबवयाच्या ध्वनीप्रदूषण, वायू प्रदूषण आणि एकापेक्षा जास्त खोलीच्या बेसमेंटबाबत उत्खनन / ब्लास्टींग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मानक कार्यप्रणाली (SOP) व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांनी 26 जुलै 2024 रोजी, ठराव क्र. 6452 अन्वये मंजूरी दिलेली आहे.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कामांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवायची “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure (SOP)”) आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक यांची 01 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता प्राप्त झालेली आहे.

या परिपत्रकानुसार सुरु असलेल्या बांधकाम तसेच पुनर्बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण करण्यासाठी विशेष पथकाची (Task Force) नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार सबंधित विभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी बांधकामाचे तोडकाम / खोदकाम / बांधकाम सुरू आहे, अशा सर्व प्रकल्पांच्या जागी जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठवड्यातून किमान एकदा प्रत्यक्ष पाहणी करुन तसा अद्ययावत अहवाल सहाय्यक संचालक, नगररचना यांना सादर करावयाचा आहे.

बांधकाम / पुनर्बांधकाम प्रकल्पांमध्ये संबंधितांकडून अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीने सदर बांधकाम परवानगी धारकाविरुध्द एमआरटीपी कायदा 1966 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,1949 अन्वये तसेच परिपत्रकातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासक / नागरिक यांना महानगरपालिकेच्या वतीने पुन:श्च जाहीर प्रकटन करुन सूचित करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकाम प्रकल्प / विकासकामांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणास आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे खोदकाम / ब्लास्टींगमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दूर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची नोंद घेण्यात यावी व त्याचे पालन करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.