तुमच्या घरात येणारे तूप भेसळयुक्त तर नाही ना?

141

गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल, तर सावध राहा. कारण, मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी टोळी अन्न व औषध प्रशासनाने पकडली आहे. घाऊक व्यापा-यांकडून एकूण 7 लाख 38 हजार 497 रुपये किमतीचे तूप जप्त करण्यात आले.

बेकरीची नियमित तपासणी करताना, तेथे वापरण्यात येणा-या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे, ठळकपणे नमूद करण्यात आले, अशी माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.

मार्केट यार्डमधील घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन तेथील तुपाचे पफ वनस्पती नमुने घेण्यात आले. तसेच, 1 हजार 288 किलो तुपाचा 3 लाख 529 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच, सेंच्युरी पफचा 4 लाख 38 हजार 966 रुपयांचा साठा जप्त केला. त्यानंतर वितरकांकडूनही 3 लाख 19 हजार 885 रुपयांचे तूप जप्त केले.

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त सरन्यायाधीश व न्यायाधीशांना आता मिळणार या सुविधा,सरकारचा निर्णय )

काय आहे धोका?

  • वनस्पती तुपातील ट्रान्स फॅटचे प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत असावे, असे कायद्याने निश्चित केले आहे.
  • पण, प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात हे प्रमाण सहा टक्क्यांपर्यंत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्याचा थेट धोका मानवी आरोग्यास आहे.
  • वनस्पती तुपामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा करणा-या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.