Food and Drug Administration : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात जनतेने जागरूक राहावे – धर्मरामबाबा आत्राम

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येते त्याचा जनतेनी लाभ घ्यावा, असेही आवाहन मंत्री आत्राम यांनी केले

125
Food and Drug Administration : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात जनतेने जागरूक राहावे - धर्मरामबाबा आत्राम
Food and Drug Administration : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात जनतेने जागरूक राहावे - धर्मरामबाबा आत्राम

मुंबई प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त बाजारामध्ये असंख्य प्रकारची मिठाई, गोड पदार्थ तसेच खव्याचे पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ भेसळयुक्त किंवा योग्य दर्जाचे नसतील तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे जनतेनेही अन्न पदार्थांच्या गुणवतेसंदर्भात जागरूक राहावे तसेच त्यांच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) मंत्री धर्मरामबाबा आत्राम यांनी मंगळवारी येथे केले.

प्रशासनामार्फत निय‍मितपणे दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांच्या काळात खाद्यतेल, खवा, तयार मिठाई, मिठाईसाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या अन्नपदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, स्थापना व्यवस्थापकांची सखोल तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. विश्लेषण अहवालात नमूद उल्लघनांनुसार कायद्यातील तरतुदीच्या अनुषांगाने कारवाई केली जाते. अन्न पदार्थांची गुणवत्ता अबाधित रहावी, याकरिता तसेच अन्नपदार्थांच्या भेसळीस आळा बसावा व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागामार्फत उपाययोजना करण्यात येते त्याचा जनतेनी लाभ घ्यावा, असेही आवाहन मंत्री आत्राम यांनी केले.

(हेही वाचा-Nawaz Sharif : भारत चंद्रावर पोहचला, पण पाकिस्तान कंगाल झाला; काय म्हणाले नवाज शरीफ?)

दरवर्षी सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे (Food and Drug Administration) खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यात येतात. गणेशोत्सव काळात भेसळयुक्त पदार्थांची गुणवत्ता कशी ओळखावी, सदोष उत्पादनासंदर्भात कोणाकडे तक्रारी कराव्यात, याची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानेही यासंदर्भात मुंबईकरांना अधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर मिठाई, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ खाण्यास योग्य आणि सुरक्षित असावेत, यासाठी अन्न प्रशासनाने अधिक सजग राहून जास्तीत जास्त कारवाई सणासुदीच्या काळात करावी, असेही निर्देश मंत्री आत्राम यांनी विभागाला दिले आहेत.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.