IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना

131

भारतीय रेल्वेचा प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने रेल्वेमार्फत विविध योजना राबवण्यात येतात. आता प्रवाशांना पीएनआर नंबरचा वापर करून प्रवासादरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवरून ऑनलाइन जेवण ऑर्डर करता येणार आहे. याबाबत रेल्वेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

( हेही वाचा : INS विक्रांतवर ‘तेजस’चे यशस्वी लँडिंग)

भारतीय रेल्वेने www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग या फूड अ‍ॅपच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे. रेल्वेत ऑनलाईन जेवण मागवण्यासाठी रेल्वेने व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय दिला आहे. यासाठी बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.

सुरुवातीला, व्हॉट्सअ‍ॅप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली. पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सअॅप नंबर संदेश पाठवला जाईल.

ऑनलाईन जेवण मागवण्यासाठी काय कराल?

  • रेल्वेचे तिकीट बुक करताना www.ecatering.irctc.co.in या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ट्रेनचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. किंवा 91-8750001323 हा मोबाईल नंबर सेव्ह करून सुद्धा तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता.
  • यानंतर प्रवासी थेट वेबसाइटवरून मार्गावर असलेल्या स्थानकांजवळील उपहारगृहांमधून जेवण मागवू शकतात.
  • एआय पॉवर चॅटबॉट प्रवाशांचे ई-कॅटरिंग संदर्भातील सर्व प्रश्न हाताळणार आहे.
  • ग्राहकांना अ‍ॅप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ऑर्डर करता येतील.
  • निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हॉट्सअ‍ॅप संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करेल.
  • या नव्या सुविधेद्वारे एका दिवसात जवळपास ५० हजार प्रवाशांना जेवण दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.