महाराष्ट्रात आता एफसीआयची अजून दोन विभागीय कार्यालये कार्यान्वित होणार!

ही कार्यालये सुरू झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलद गतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे.

81

भारतीय अन्न महामंडळ(एफसीआय)ची महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रात एफसीआयची आणखी दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे १० मेपासून तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरवणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंबंधीची घोषणा करताना सांगितले.

जलद गतीने कामे होण्यास मदत होणार

यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, समाजसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक यांना मोठा लाभ मिळेल. ही कार्यालये सुरू झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलद गतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

(हेही वाचाः पुण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड! २१ इंजेक्शन जप्त! )

एफसीआयची भूमिका सर्वात महत्त्वाची

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना अन्नसुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचवेळी, देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीने एफसीआय ही एक विश्वासार्ह संस्था म्हणूनही गणली जाते. देशातील व महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कार्यालयांच्या माध्यमातून एफसीआय अतिशय कार्यक्षमपणे कारभार सांभाळत आहे. कोविड काळात एफसीआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून, देशवासियांसाठी अविश्रांत काम करणाऱ्या या संस्थेचा मला अभिमान आहे, अशी भावनाही दानवे यांनी व्यक्त केली.

ही आहेत एफसीआयची विभागीय कार्यालये

गोव्यासह महाराष्ट्र राज्यात 6 विभागीय कार्यालयांमार्फत एफसीआयचे काम चालते. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या रचनेमध्ये मुंबई आणि उपनगरीय क्षेत्राला सेवा देणारे बोरीवली येथील विभागीय कार्यालय, रायगडला सेवा पुरवणारे पनवेल विभागीय कार्यालय, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्याला सेवा पुरवणारे पुणे विभागीय कार्यालय, संपूर्ण विदर्भाला सेवा पुरवणारे नागपूर येथील विभागीय कार्यालय आणि नाशिक, खानदेश व मराठवाड्याच्या बहुतांश भागाला सेवा देणारे मनमाड विभागीय कार्यालय यांचा समावेश आहे.

(हेही वाचाः कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स!)

image001Q6FQवरील सारणीत दाखवल्याप्रमाणे नवीन विभागीय कार्यालये त्यांच्या अंतर्गतच्या महसुली जिल्ह्यांसाठी त्वरित कार्यान्वित होत आहेत. नवीन संरचनेनुसार सदर विभागीय कार्यालये साठवण क्षमतांचे व्यवस्थापन, दैनंदिन कार्ये, सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी मालाची उचल आणि गरजेनुसार खरेदी प्रक्रिया अशा सर्व कामांवर देखरेख करतील.

एफसीआयची देशभरात 26 प्रादेशिक कार्यालये

उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी क्षेत्रीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये, विभागीय कार्यालये आणि आगाराच्या मार्फत एफसीआय कार्यरत आहे. देशभरात एफसीआयची 05 क्षेत्रीय कार्यालये (पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर आणि ईशान्य) आणि 26 प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. महसुली जिल्ह्यांच्या आधारे प्रादेशिक कार्यालयान्तर्गत विभागीय कार्यालये काम करतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.