कोविड काळात नर्ससह रुग्णालय आणि इतर विभागांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मदत करत एकप्रकारे त्यांच्या कर्तव्याचा गौरव माजी महापौर हेमांगी वरळीकर आणि मुंबई म्युनिसिपल को-ऑप. बँकेचे संचालक आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. रुग्णालय आणि महापालिका चिटणीस विभागातील तब्बल दोन हजार कर्मचाऱ्यांना अन्नधान्य पाकीटांचे वाटप करण्यात आले आहे.
२ हजार अन्न पाकीटांचे वाटप
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तसेच पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, माजी महापौर व शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर आणि युवासेना सिनेट सदस्य व मुंबई म्युनिसिपल को-ऑप बँकेचे संचालक प्रदीप सावंत यांच्या विशेष सहकार्याने मुंबईतील महापालिकेच्या शीव रुग्णालय, शिवडी क्षय रोग रुग्णालय, केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे काम करणाऱ्या नर्सेस, तसेच चतुर्थ श्रेणीतील रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांना अन्नधान्य पाकीटांचे वाटप ए, बी व ई प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
(हेही वाचाः दिव्यांगांच्या अन्न वाटपाचा ‘फेक’ मेसेज!)
यावेळी म्युनिसिपल कामगार सेनेच्या सरचिटणीस ॲड. रचना अग्रवाल, उपविभाग प्रमुख हरिष वरळीकर, शाखाप्रमुख हेमंत कदम, म्युनिसिपल को-ऑप बँकेचे संचालक महावीर बनगर, मुकेश घुमरे, सिनेट सदस्य राजन कोळंबेकर व स्थानिक पदाधिकारी आशिष पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे महापालिका सचिव विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. महापालिका सचिव संगिता शर्मा आणि कर्मचारी शेखर धोत्रे, उदय पाटील, समीर सुर्वे, गुरुनाथ साटम आणि अधिकारी नेहा धुमाळ उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community