सांगलीमधील एका आश्रमशाळेतील तब्बल १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर काहींची प्रकृती स्थिर आहे.
(हेही वाचा – Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास)
नेमका प्रकार काय?
सांगली येथील समता आश्रम शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची संख्या १७० च्या वर आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, यातील काही मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उमदी येथे रविवारी एका मंगल कार्यालयात कार्यक्रम होता. तेथील शिल्लक राहिलेले जेवण आश्रमशाळेतील (Food Poisoning) मुलांना दिले. या जेवणातील बासुंदीमुळे अनेकांना त्रास सुरु झाला. जेवणाच्या काही वेळानंतर मुलांना त्रास होऊ लागला. त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
काहींची प्रकृती चिंताजनक (Food Poisoning) असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अजूनही काही मुले ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. मुले जेवल्यानंतर मुलांना उलट्या (Food Poisoning) होऊ लागल्याने तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community