Food Poisoning : पिंपरी-चिंचवडमध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

183
Food Poisoning : पिंपरी-चिंचवडमध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

(हेही वाचा – Durga Devi Idol : बांगलादेशात कट्टरपंथींनी केली दुर्गादेवीच्या मूर्तींची विटंबना)

पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेतील साडेतीनशे मुलांना ब्रेड आणि चटणी खाल्ल्याने विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेत आज अल्पोपहार ठेवण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी हा मेनू देण्यात आला.

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन सदस्य अखेर बडतर्फ)

अल्पोपहार घेतल्यानंतर काही मिनिटांतच विद्यार्थ्यांना उलटी, मळमळल्यासारखं व्हायला लागलं, काही विद्यार्थ्यांना भोवळ आली, त्यामुळे तातडीने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं. यावेळी शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. (Food Poisoning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.