रोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वे प्रशासनाचा असतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करताना अनेकदा जेवणाची गैरसोय होते. याकरीता आयआरसीटीसी (IRCTC) 2 एप्रिलपासून विशेष सुविधा सुरू करणार आहे. हे जेवणात उपवासाच्या पदार्थांचाही समावेश असेल.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्यांच्या डब्ब्यात कायमस्वरूपी वाढ! )
अशी करा नोंदणी
हे जेवण पूर्णपणे सात्विक आणि शुद्ध असणार आहे तसेच या जेवणामध्ये कांदा आणि लसूणचा समावेश नसणार आहे. हे पदार्थ शिजवताना सामान्य मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर केला जाईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना ई-केटरिंग किंवा 1323 क्रमांकावर कॉल करून नोंदणी करावी लागणार आहे.
( हेही वाचा : रेल्वेत नोकरी करायची आहे? मग ही बातमी आवश्य वाचा )
उपवासाची थाळी
उपवासाच्या थाळीची किंमत १२५ रुपयांपासून ते २०० रुपये असणार आहे. 2 एप्रिलपासून 500 गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. कॉल करून नोंदणी केल्यावर ही उपवासाची थाळी रेल्वे स्थानकांवरील दुकानांमध्ये उपलब्ध होईल. या उपवासाच्या थाळीत लस्सी, फळांचा ताजा रस, भाजी पुरी, भजी, फळं, चहा, दुग्दजन्य पदार्थ (रबडी, लस्सी), सुक्या मेव्याची खीर आदी पदार्थ असणार आहेत.
Join Our WhatsApp Community