Footpath Collapsed In Mulund : मुलुंडमध्ये फूटपाथ खचून दुचाकींचे नुकसान

105
Footpath Collapsed In Mulund : मुलुंडमध्ये फूटपाथ खचून दुचाकींचे नुकसान
Footpath Collapsed In Mulund : मुलुंडमध्ये फूटपाथ खचून दुचाकींचे नुकसान

मुलुंडच्या पी के रोड परिसरात १५ सप्टेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास फूटपाथ खचून ६ दुचाकींचे नुकसान झाले आहे. (Footpath Collapsed In Mulund) रात्रीच्या वेळी अचानक मुलुंडच्या केशवपाडा परिसरात एका इमारती समोरील फूटपाथ अचानक खचला. त्याखालील ड्रेनेज लाईनमध्ये या त्यावर उभ्या असलेल्या सर्व दुचाकी कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कोणलाही दुखापत अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे २ वर्षांपूर्वीच या फूटपाथचे काम करण्यात आलं होते. परंतु २ वर्षातच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे याचा काही भाग अचानक कोसळला.

(हेही पहा – Ban From Maharashtra Government : परराज्यात ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी)

हा फूटपाथ ४ ते ५ फूट खचला. (Footpath Collapsed In Mulund) रात्रीच्या वेळी या फूटपाथवरुन कोणीही ये-जा करत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही दुर्घटना घडली त्यावेळी या फूटपाथवरून माणसांची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या ५ फूट खोल असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये या फूटपाथवर पार्क केलेल्या ६ दुचाकी कोसळल्यामुळे या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण भाग हा सील केला आहे. ज्या कंत्राटदाराने असे निकृष्ट दर्जाचे फूटपाथ बांधले आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रस्ता रोधक उभे करून दुर्घटनाग्रस्त फूटपथावर प्रवेश मनाई केली.

 “ही घटना दुर्दैवी आहे. अडीच वर्षांच्या आत फूटपाथ खचतोय. महापालिकेच्या कंत्राटदारावर कारवाई व्हायला हवी, असे काम यापुढे व्हायला नको. या रस्त्यावर रहदारी असते, सुदैवाने फारशी वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे स्थानिक नेते उत्तम गीते यांनी दिली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनीही संताप व्यक्त केला आहे. (Footpath Collapsed In Mulund)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.