माझे फूटपाथ, माझी जबाबदारी अंतर्गत हाती घेतलेल्या मोहिमेनसार मुंबई सेंट्रल, ताडदेव परिसरातील फूटपाथची पाहणी केली. विशेष म्हणजे आजवर पाहणी केलेल्या अनेक भागांमधील फूटपाथच्या तुलनेत या भागातील फूटपाथ चालण्यास योग्य असल्याचे दिसून आले. शिवाय ज्या चक्षूतून फूटपाथची पाहणी करत होतो, त्या चक्षूतूनही अशा तुटलेल्या फुटलेल्या लाद्या, उखडलेले पेव्हरब्लॉक असे काही दृष्टीस पडत नव्हते.
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
परंतु फूटपाथ चालण्यासाठी योग्य असले तरी याच फूटपाथवरील मॅनहोल्स तथा गटारांवरील झाकणांच्या परिसरातील खचलेल्या भागांमुळे फूटपाथवरुन पादचाऱ्यांची चाल बिघडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका अरुंधती अरुण दुधवडकर यांनी योग्यप्रकारे विभागातील फूटपाथची काळजी घेतली आहे. अशीच काळजी मुंबईतील इतर नगरसेवकांनी आणि सहायक आयुक्तांनी घेतल्यास मुंबईकरांना चांगल्या दर्जाचे फूटपाथ उपलब्ध होतील.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
फूटपाथ चांगले पण…
मुंबई सेंट्रल परिसरातील नूर महल, अझिझ बिल्डींग, आदम महल प्रमोद बार शेजारी, ताडदेव सुलभ शौचालयासमोरील, सोनावाला इमारतीसमोरील काही फूटपाथवर मॅनहोल्स आणि गटारांच्या झाकणांचा भाग खचल्याने, त्याच्या आसपासचा भागही खचल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः दादासाहेब फाळके मार्गाच्या फुटपाथवरुन कसे चालाल?)
त्यामुळे फूटपाथ चालण्यास योग्य असले तरी याच काही गटारांच्या झाकणांची, परिसरातील पेव्हरब्लॉकची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने, चांगल्या फूटपाथवर काळे डाग लागले जात आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांचे विभागातील अनेक भागांकडे लक्ष असल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः ‘त्या’ फूटपाथची सुधारणा झाली)
फूटपाथ वाहने उभी करण्यासाठी की चालण्यासाठी?
ताडदेवमधून मुंबई सेंट्रल स्थानकाकडे जाणाऱ्या सानेगुरुजी मार्गाच्या डावीकडील फूटपाथ सिमेंट काँक्रिटचा आहे. हा फूटपाथ चालण्यास मोकळा असून, फेरीवाल्यांनी रस्त्यांवर धंदे थाटले आहेत. दुचाकी आणि वाहनांच्या आड फेरीवालेही रस्त्यावर बसून धंदा करत आहेत.
(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)
तर उजवीकडील फूटपाथचेही स्टॅपिंग काँक्रिट केले असून, या फूटपाथचा वापर पादचाऱ्यांऐवजी दुचाकी आणि इतर वाहनांसह दुकानदार आपला माल ठेवण्यासाठी करत आहेत. त्यामुळे एक फूटपाथ चालण्यास मोकळा, तर दुसरा अतिक्रमित होत असल्याने लोकांनी चालायचे तरी कुठे आणि फूटपाथची सुधारणा लोकांना वाहने आणि सामान ठेवण्यासाठी केली की, चालण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः बोरीवलीतील एल.टी. मार्ग, एस.व्ही.मार्गावरुन चालायचे कसे? नगरसेवकांचं लक्ष कुठे?)
या भागांत अशी आहे फूटपाथची परिस्थिती
- नूर महल, ताडदेव
- अझीझ बिल्डिंग, ताडदेव
- आदम महाल, ताडदेव
- आदम महल, प्रमोद बार शेजारी
- ताडदेव सुलभ शौचालया समोर
- ताडदेव सोनावाला बिल्डींग, सेल पॉईंट जवळ
- साने गुरुजी मार्ग एक फूटपाथ मोकळा, दुसरा अतिक्रमित
- हिरवी चाळसमोर वाहनेच फूटपाथवर
- करण इमारतीसमोर साने गुरुजी मार्ग दुचाकी पार्क
(हेही वाचाः रस्ते आणि फुटपाथवरील चरींमध्ये ६० कोटींची भरणी)
Join Our WhatsApp Community