बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या अखत्यारित येणाऱ्या मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉलची जागा भाड्याने देण्यासाठी मागवलेली निविदा स्थगित केल्यानंतर व्यवस्थापनाने आता या जागेचे वर्षभरासाठी आरक्षण बूक करण्यासाठी सूचना पत्र जाहीर केले आहे. यामध्ये येत्या १ जूनपासून मासिक कालावधीसाठी रिक्त आरक्षित कोर्ट प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार शुल्क भरण्यासापेक्ष देण्यात येणार आहे. मात्र, हे प्रशिक्षण फक्त सोमवार ते शुक्रवार या कालवधीत होणार असून शनिवारी व रविवारी अन्य कार्यक्रमांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी मुलांना प्रशिक्षण घेता येणार नसून, खेळाडुंच्या प्रशिक्षणाच्या जागांवर या दोन्ही दिवशी पाटर्या केल्या जाणार आहेत.
…म्हणून निविदेला स्थगिती देण्यात आली होती
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याने, येथील प्रत्येक विभागाचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील बॅटमिंटन कोर्टची जागा कंत्राटदाराने स्वत: खर्चाने विकसीत करून सात वर्षे वापरण्याकरता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाला अंदाजित ९५ लाखांचे भाडे आकारण्यासाठी निविदा मागवली होती. या निविदेत २५ लाखांचे डिपॉझिट भरण्याची अट निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु या निविदांबाबत आक्षेप नोंदवला गेल्याने या निविदेला स्थगिती देण्यात आली होती.
असा ठरवला जाणार प्राधान्य क्रम
परंतु त्यानंतर २० मे २०२२ रोजी प्रतिष्ठानच्या व्यवस्थापनाने कार्यालयीन आदेश बजावत सभा डेली तिकीट वगळता इतर वेळी जो कोणी उदा पाहुणा खेळाडू, खासगी शिकवणी, अकादमी यापैकी जो कोणी सकाळी १० ते ते रात्रौ १० या वेळेत वार्षिक ४ कोर्टचे आगावू शुल्क भरुन आरक्षण करेल त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तर जो कोणी सहा महिन्यांचे आगावू शुल्क भरुण आरक्षण करेल त्याला दुसऱ्या आणि तिन महिन्यांचे आरक्षण आगावू शुल्क भरुन करेल त्याला तिसऱ्या क्रमांचे प्राधान्य देण्यात येईल. तर जो कोणी मासिक आरक्षण करेल त्याला चौथ्या क्रमाकांचे प्राधान्य देण्यात येईल. प्रथम शुल्क भरणाऱ्यास आरक्षण देण्यात येईल,असे व्यवस्थापनाने या जाहिर केले आहे.
( हेही वाचा: भांडुप, पवई आणि विक्रोळीच्या डोंगराळ भागातील जनतेला धोक्याचा इशारा )
शनिवार- रविवार खेळाडूंना सुट्टी
प्रति तास ७५० रुपयांचे शुल्क यासाठी आकारण्यात येणार असून दिवसाला एका खासगी शिकवणी तथा अकादमी आदींना दिवसाला सुमारे ९ हजार रुपये शुल्क अदा करावे लागणार आहेत. त्यामुळे महिन्याला या खेळाडू घडवणाऱ्या अकादमीला सुमारे पावणे तीन लाख रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे आगावू शुल्क भरुन आरक्षण केले तरी ते सोमवार ते शुक्रवार या दिवसांकरताच राहणार असून शनिवार व रविवारी प्रशिक्षण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खेळाडुंनी या दोन्ही दिवशी सुट्टी घ्यायची आहे.
मात्र, त्यातही जर अन्य कोणी आरक्षण नोंदवल्यास त्या दिवशी खेळ बंद ठेवून त्या दिवसाचा खेळ अन्य दिवशी सामावून घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ललित कला व क्रिडा केंद्रातील खेळाच्या काही मोकळ्या जागांचे व्यावसायिकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community