गणेशोत्सवासाठी १८ ऑगस्टपासून सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान फेरी होणार सुरू

84

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वेगाड्या फुल्ल असतात. म्हणूनच आता कोकणवासीयांसाठी वाढीव विमान फेरीचे नियोजन करण्यात आले आहे.

१८ ऑगस्टपासून सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान फेरी होणार सुरू

चिपी विमानतळावर १८ ऑगस्टपासून दुसरे विमान सुरु करण्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. १८ ऑगस्टपासून सायंकाळी ३ वाजता मुंबईहून हे विमान सुटेल आणि ४.२० वाजता ते विमान सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग करणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी पुन्हा ४.४५ ला विमान टेक ऑफ घेत ६.२० वा. मुंबईला येईल.

( हेही वाचा : Free Metro Travel : स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना करता येणार मोफत मेट्रो प्रवास!)

गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही एक सुसंधी असून, चाकरमान्यांनी देखील या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राणे यांनी केले आहे. तूर्तास गणेशोत्सवासाठी ही नवीन विमान फेरी सुरू केली आहे. परंतु येत्या काळात ही विमानसेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.