महिला बचत गटांसाठी, आठवडी बाजारासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या महिलांना प्रशिक्षण तसेच अनुदान देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू आगळ्यावेगळ्या असल्याने त्यांना अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने लवकरच ठोस उपक्रम हाती घेतला जाईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. (Mahila Bachat Gat)
मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीकरीता जोगेश्वरी येथील मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम येथे रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला. या बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास एशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) आफरिन सिद्दीकी, पब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालय, अमेरिका) सीटा रैटा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर आदी उपस्थित होते. (Mahila Bachat Gat)
महानगरपालिका नियोजन विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांसाठी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील सर्वच महिला बचत गट उपक्रमशील आहेत. त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रयत्नशील राहील, असे आश्वासन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिले. (Mahila Bachat Gat)
अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे म्हणाले, महिला बचत गटांसाठी, आठवडी बाजारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या महिलांना प्रशिक्षण तसेच अनुदान देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू आगळ्यावेगळ्या असल्याने त्यांना अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने लवकरच ठोस उपक्रम हाती घेतला जाईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, आठवडी बाजारातील काही महिलांनी जागेच्या संदर्भात केलेल्या मागणीनुसार जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शिंदे यांनी नियोजन विभागाला दिले. (Mahila Bachat Gat)
यासाठी आठवडी बाजारचे आयोजन
मुंबई महानगरपालिका जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत दरवर्षी सरासरी ६०० ते ८०० महिला बचत गट स्थापित करण्यात येतात. महापालिकेने महिला बचत गटांची गरज लक्षात घेऊन, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक तत्वावर महिला आठवडी बाजार उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. या आठवडी बाजारात एकूण ८० महिला बचत गटांचे स्टॉल लागले आहेत. या ठिकाणी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी महिला बचत गटांना त्यांची उत्पादने विक्री करता येणार आहेत. प्रत्येक आठवड्यात नवीन महिला गटांना आळीपाळीने स्टॉल लावण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Mahila Bachat Gat)
या वस्तू असतील उपलब्ध
महानगरपालिकेच्या महिला बचत गटांव्यतिरिक्त केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या योजनेतील महिला बचत गटांना सहभागी करून घेत संधी देण्यात आली आहे. आठवडी बाजारामध्ये हस्तकला, वारली पेंटिंग, मेहंदी, इमिटेशन ज्वेलरी आदी प्रकारचे स्टॉल्स असून त्यातून विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (Mahila Bachat Gat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community