‘मुस्लिमांसाठी संविधानापेक्षा शरीया मोठा’; डॉ. आंबेडकर जयंतीला मंत्री Hafizul Hasan Ansari चे वादग्रस्त विधान

121
'मुस्लिमांसाठी संविधानापेक्षा शरीया मोठा'; आंबेडकर जयंतीला मंत्री Hafizul Hasan Ansari चे वादग्रस्त विधान
'मुस्लिमांसाठी संविधानापेक्षा शरीया मोठा'; आंबेडकर जयंतीला मंत्री Hafizul Hasan Ansari चे वादग्रस्त विधान

झारखंडचे (Jharkhand) क्रीडा आणि युवा व्यवहार आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री हाफिजुल हसन अन्सारी (Hafizul Hasan Ansari ) म्हणाले की, शरीयत (Sharia) संविधानापेक्षा मोठे आहे. मुस्लिमांबद्दल बोलताना हाफिजुल हसन अन्सारी म्हणाले की, आम्ही कुराण हद्यात ठेवतो आणि संविधान (Constitution) हातात ठेवतो. त्यामुळे मुस्लिम लोक आधी शरीयतला मानतात आणि नंतर संविधानाला, असेही अन्सारी (Hafizul Hasan Ansari) म्हणाले. एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

( हेही वाचा : Aseem Foundation : सिमरी गाव सौरऊर्जेने झाले प्रकाशमय; हुतात्मा जवानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला प्रकल्प

झारखंडच्या युती सरकारमध्ये काँग्रेस (Congress) पक्षचाही समावेश आहे. एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रत्येक कार्यक्रमात संविधानाचे नाव घेतात. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या हाफिजुल हसन अन्सारीच्या विधानाबद्दल गांधींनी चकार शब्दही उच्चारला नाही. राहुल गांधींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘संविधान बचाव’ असा पवित्रा घेतला होता. पण आता इंडी आघाडीच्या नेत्याने शरीयतचे समर्थन केले आहे.

मंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना झारखंड राज्य भाजपाने म्हटले आहे की, “ज्यांच्या हृदयात शरिया आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेशचे दरवाजे खुले आहेत. भारत फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालेल आणि तेच आमच्यासाठी सर्वोच्च राहील.” दरम्यान, गोड्डा येथील भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे कोणतेही मूल्य नाही. हे झारखंड सरकारचे मंत्री हाफिजुल अन्सारी (Hafizul Hasan Ansari) आहेत, त्यांच्या मते, प्रथम शरिया कायदा म्हणजे मुस्लिम संविधान, नंतर इतर कोणतेही संविधान. मीडिया काहीही बोलणार नाही कारण इंडी युती हेच म्हणत आहे.”

कोण आहेत हाफिजुल हसन अन्सारी?

हाफिजुल हसन अन्सारी हे २०२१ पासून गोड्डाच्या मधुपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील हाजी हुसेन अन्सारी (Hafizul Hasan Ansari) चार वेळा येथून आमदार होते. झारखंडमध्ये मंत्री होणारे ते पहिले आणि एकमेव मुस्लिम होते. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय देण्यात आले. हाजी हुसेन अन्सारी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरीही झाली. झारखंडमध्ये, बांगलादेशी घुसखोरांनी (Bangladeshi infiltrators) आदिवासी समुदायाच्या जमिनी बळकावल्याचा प्रकार समोर आला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अलीकडेच मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याचाही हाफिजुल हसन अन्सारी (Hafizul Hasan Ansari ) यांनी निषेध केला होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.