मृत्यु झाला स्वस्त, ५०० रुपयांसाठी वर्सोव्यात एकाची हत्या

मृत विक्रम निषाद यला नशा करण्याची व्यसन होते. त्याने परीसरात राहणाऱ्या घनश्याम दास यांच्याकडून ५००रुपये उधारीवर घेतले होते.

उधारीवर घेतलेले ५०० रुपये परत केले नाही म्हणून ३५ वर्षीय इसमाची दोन जणांनी मिळून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील वर्सोवा येथे उघडकीस आली आहे. अवघ्या काही तासांतच मारेकऱ्यांचा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

विक्रम निषाद असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. वर्सोवा येथील गोमागल्ली याठिकानी शुक्रवारी सायंकाळी वर्सोवा पोलिसांना विक्रम निषाद याचा मृतदेह रक्तरंजित अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटलेली नसल्यामुळे पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवली.

शरीरावरील ‘टॅटू’मुळे पटली ओळख

वर्सोवा पोलिसांना मृतदेह मिळून आला मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. तपास पथकाने मृतदेहाच्या शरीरावर काढलेल्या टॅटू (गोंधण) व फोटो अनेकांना दाखवण्यात आला. त्यावेळी हा मृत इसम विक्रम निषाद असल्याचे त्याच्या टॅटू वरून कळाले. विक्रम हा त्याच परिसरात राहण्यास होता व त्याला नशा करण्याची व्यसन होते. त्याने परीसरात राहणाऱ्या घनश्याम दास यांच्याकडून ५००रुपये उधारीवर घेतले होते.

(हेही वाचा : कशी स्थापन झाली पहिली भारतीय लोकसभा? वाचा…)

उधारी परत करीत केली नाही म्हणून…

विक्रम ने घेतलेले ५००रुपये परत करीत नसल्यामुळे घनश्याम दास आणि विक्रम यांच्या काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी घनश्याम हा मित्र संदीप रॉय याच्यासोबत गामागल्ली येथे आले, त्याठिकाणी विक्रम त्यांना भेटला. घनश्यामने विक्रमकडे ५०० रुपये मागितले मात्र विक्रम याने आता माझ्याकडे नाही, असे सांगताच घनश्याम आणि संदीप या दोघांनी त्याला मारहाण करून धारदार शस्त्राने त्याची हत्या करून पळून गेले.

दोघांना केली अटक

वर्सोवा पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून दोघांचा शोध घेऊन रात्री उशिरा संदीप आणि घनश्याम या दोघांना वर्सोवा परिसरातून अटक केली. दोघांनी गुन्हा कबूल केला असून उधारीच्या पैशासाठी हत्या केल्याचे दोघांनी पोलिसांकडे कबुली दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here