-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प कामांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने येत्या मार्च ते एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नालेसफाईच्या कामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर होणार असून प्रत्येक मोठ्या आणि छोट्या नाल्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवले जाणार आहे. या कॅमेरांच्या माध्यमांतून नालेसफाईच्या कामांवर महापालिका प्रशासन नियंत्रण तसेच देखरेख ठेवली जाणार आहे.
(हेही वाचा – CC Road : मुंबई शहर व उपनगरांमध्ये आता एकाही रस्त्यावर होणार नाही खोदकाम)
मुंबईतील मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईसाठी महापालिकेच्यावतीने सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया अंतिम होवून पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. मात्र, आजवर नालेसफाईच्या कामांबाबत घोटाळ्याचे आरोप वारंवार होत असून या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, प्रत्येक वेळी नालेसफाईच्या कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास टाळाटाळ केली जात होती परंतु आगामी नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी कंत्राटदाराच्या माध्यमातून सीसी टिव्ही कॅमेरे बसवले जाणार असून या सीसीटीव्ही कॅमेरांच्या (CCTV Camera) माध्यमातून कामांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
(हेही वाचा – दुग्धशाळा वसाहतींच्या विकासासाठी शासन एकात्मिक योजना राबवणार का?; भाजपा गटनेते Pravin Darekar यांचा सवाल)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले असून प्रशासनाने या कामांमध्ये कंत्राटदारांना सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्याची सक्ती केल्याने एकप्रकारे या कामांमध्ये पारदर्शकता राहिल आणि प्रत्येक अर्धा तासाने याची व्हिडीओ सेव केले जातील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी प्रत्येक दिवशी केलेल्या कामांचे व्हिडीओ अपलोड केले जायचे, परंतु आता प्रत्यक्ष काम सुरु असताना महापालिकेतून अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांसह सामान्य जनतेलाही पाहता येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community