सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील रुग्णसंख्या पाचशेच्या आत!

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ९२५ दिवसांवर गेला!

188

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या आत रुग्ण संख्या स्थिर राहिली आहे. सोमवारी जिथे ४७८ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी, १३ जुलै रोजी संख्या कमी होवून ४४१ एवढे नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ६०० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेच्या खाली स्थिर राहिल्याने मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

मंगळवारी ८ रुग्णांचा मृत्यू!

मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत ६,९५० रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. तर दिवसभरात ४४१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी ३० हजार १०० कोविड चाचण्या करण्यात आल्या, त्यात ४४१ नवीन रुग्ण आढळून आले. तर सोमवारी दिवसभरात २७ हजार ८२७ कोविड चाचण्या करण्यात आल्या, त्यात ४७८ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी जिथे ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे मंगळवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी मृत्यू झालेल्या ०८ रुग्णांपैकी ०४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ०५ रुग्ण हे पुरुष तर ३ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये २ रुग्ण हे चाळीशीच्या आतील आहेत. तर ४ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत २ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.

(हेही वाचा : २०२५ पर्यंत नवीन वाहन खरेदीत १० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश!)

रुग्ण दुपटीचा दर ९२५ दिवसांवर गेला!

मुंबईतील रुग्णांचे बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९२५ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या अवघ्या पाचवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ६५ वर आली आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.