Forbes Billionaires List : जगातील सगळ्यात वयोवृद्ध अब्जाधीशाचं वय माहीत आहे?

Forbes Billionaires List : अमेरिकेतील विमा क्षेत्रातलं हे अग्रगण्य नाव आहे. 

249
Forbes Billionaires List : जगातील सगळ्यात वयोवृद्ध अब्जाधीशाचं वय माहीत आहे?
  • ऋजुता लुकतुके

फोर्ब्स मासिकाने आपली २०२४ साठीची जागतिक अब्जाधीशांची मानाची यादी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थातच फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट आहेत. गेल्यावर्षीच त्यांनी टेस्लाचे एलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे. पण तुम्हाला जगातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश कोण आहे हे आज सांगणार आहोत. अमेरिकेचे विमा उद्योजक जॉर्ज जोसेफ हे जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश आहेत. सध्या त्यांचे वय हे १०२ वर्ष आहे. (Forbes Billionaires List)

जॉर्ज जोसेफ यांच्याकडे मोठी संपत्ती आहे. फोर्ब्स २०२४ च्या यादीनुसार जोसेफ यांच्याकडे १.७ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. या संपत्तीसह ते जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश बनले आहेत. जॉर्ज जोसेफ यांची लॉस एंजेलिस येथे मर्करी जनरल कॉर्पोरेशन ही विमा कंपनी देखील आहे. विमा क्षेत्रात त्यांच्या कंपनीचं मोठं काम आहे. जोसेफ यांची विमा कंपनी ऑटोमोबाईलसह होम आणि फायर यासह विविध विमा उत्पादनांची विक्री करते. ही विमा कंपनी सार्वजनिकपणे व्यापार करते. (Forbes Billionaires List)

(हेही वाचा – RBI MPC Highlights : युपीआयने बँकेत पैसे कसे जमा करायचे?)

भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, जोसेफ यांनी मोठा संघर्ष केला आहे. सरुवातीला त्यांनी एका विमा कंपनीत काम देखील केलं आहे. ते घरोघरी जाऊन विमा विक्रीचं काम करत होते. त्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये मर्क्युरी जनरल कॉर्पोरेशनची स्थापना केली. या कंपनीचा महसूल सध्या ४.६ अब्ज डॉलर आहे. मोठी उलाढाल या कंपनीची होते. जोसेफ यांचा जन्म १९२१ मध्ये झाला होता. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण वेस्ट व्हर्जिनिया इथं झाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठामधून त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी फ्लाइट नेव्हिगेटर म्हणून काम देखील केलं होतं. (Forbes Billionaires List)

जोसेफ यांनी उत्तर आफ्रिका आणि इटलीमध्ये ५० मोहिमा यशस्वी केल्या होत्या. दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितच असेल. मुकेश अंबानी हे भारतातीतल सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणत संपत्ती आहे. (Forbes Billionaires List)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.