‘फोर्ब्स’ (Forbes 2023) या अमेरिकन बिझनेस मासिकाने नुकतीच जगातल्या १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गज महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे या यादीत ३ भाजप नेत्यांचा समावेश आहे.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा या यादीत समावेश आहे, तर सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांनी व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे, अशा अन्य ३ भारतीय महिलांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
(हेही वाचा – Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा आता भारताच्या अस्मितेला हात; ‘या’ धमकीनंतर वाढवली सुरक्षा )
कोणी पटकावला मान?
या यादित अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ३२व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. २०१९ मध्ये निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री बनल्या. त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत आहेत. फोर्ब्सच्या या यादीमध्ये अर्थमंत्र्यांसह HCL Corpच्या CEO रोशनी नादर मल्होत्रा यांना ६० व्या स्थानावर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल यांना ७०व्या स्थानावर आणि बायकॉनचे संस्थापक किरण मुझुमदार शॉ यांना ७६व्या स्थानावर येण्याचा मान पटकावला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community