- ऋजुता लुकतुके
फोर्स गुरखा फाईव्ह डोअर गाडीचं टेस्ट ड्राईव्ह जोरात सुरू आहे. आजूबाजूला रस्त्यावर तुम्हालाही ही कार दिसू शकेल. (Force Gurkha 5 Door)
फोर्स गुरखा फाईव्ह डोअर ही एसयुव्ही गाडी आता भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे. तिचं टेस्ट ड्राईव्ह जोरात सुरू आहेत. फोर्स कंपनीच्या गुरखा या सर्वाधिक लोकप्रिय गाडीचा हा फाईव्ह डोअर प्रकार असणार आहे. चालकाखेरीज इतर सहा जण या गाडीने एकावेळी प्रवास करू शकतील. (Force Gurkha 5 Door)
(हेही वाचा – Ind W vs Eng W : भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटीत इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय)
२,५९६ सीसी क्षमतेचं डिझेलवर चालणारं इंजिन या गाडीत आहे. सध्याच्या थ्री जोअर गाडीचंच इंजिन या मोठ्या गाडीतही असेल. आणि गाडीला ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. गाडीच्या इंजिनाची क्षमता ९० पीएस आणि २५० एनएम अशी आहे. या गाडीत सात इंचांचा डिस्प्ले असेल आणि पहिल्या तसंच दुसऱ्या रांगेत पॉवर विंडो देण्यात आले आहेत. तसंच गाडीत मॅन्युअल एसी व्हेंट देण्यात आले आहेत. (Force Gurkha 5 Door)
Force Gurkha 5-door spotted testing!
Desi alternative to the Mercedes G-Wagon🤪? pic.twitter.com/UbzVUD7mkR
— MotorOctane (@MotorOctane) July 15, 2023
(हेही वाचा – Ind vs SA : दीपक चहर आणि मोहम्मद शामी दौऱ्यातून आऊट)
याचबरोबरच या एसयुव्हीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दोन एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तसंच रिव्हर्सिंग कॅमेरा आणि रेअर पार्किंग सेन्सरही गाडीत आहेत. मारुती जिमनी तसंच महिंद्रा थार या गाडींशी फोर्स गुरखा गाडीची स्पर्धा असेल. फोर्स गुरखा गाडीची किंमत असेल १६ लाख रुपये. (Force Gurkha 5 Door)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community