गेल्या अनेक दिवसांपासून धर्मांतर, (Forced conversion) लव्ह जिहाद, एकतर्फी प्रेम, अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. दिल्लीमधील साक्षी हत्याकांड हे प्रकरण ताजं असतांनाच आता उत्तर प्रदेश येथील बरेलीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मुस्लिम तरुणाने हिंदू असल्याचं भासवलं आणि एका हिंदू मुलीची फसवणूक केली. तसंच त्या तरुणीला त्याच्या वडिलांशी सेक्स करायला लावला आणि जबरदस्तीने धर्मांतर (Forced conversion) करण्यास देखील भाग पडले. २४ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अबिद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने या पीडित तरुणीला स्वतःची ओळख अनिकेत अशी करुन दिली होती.
(हेही वाचा – Railway : रेल्वेमधून ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी; मुसलमानांना अटक केली)
नेमका प्रकार काय?
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अबिदने या मुलीला अनिकेत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, पुढे या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्याने तिला लग्नाचं वाचन देत शरीरसंबंध ठेवले. मात्र त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल (Forced conversion) करु लागला. तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी तो तिला देत होता.
पीडित मुलीने पुढे असं सांगितलं की, “मला अबिदने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि त्याच्या वडिलांशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं. एवढंच नाही तर अबिदने मला जबरदस्तीने धर्मांतरही (Forced conversion) करायला लावलं. जेव्हा या सगळ्याबाबत मी अबिदकडे तक्रार केली तेव्हा त्याने मला मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबाने देखील मला कोंडून ठेवलं होतं. मी कशीबशी स्वतःची सुटका करुन पळाले.”
हेही पहा –
बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी विषयीची माहिती देताना सांगितलं की आम्ही पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बळजबरीने धर्म परिवर्तनाची (Forced conversion) तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून आम्ही अबिदला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community