धक्कादायक! परदेशी ड्रग्स तस्कराकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला!

नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर ३० येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला एनसीबीने ताब्यात घेतले.

87

ड्रग्स तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर ड्रग्स तस्कराकडून हा तिसरा हल्ला आहे. हल्ल्यानंतर देखील अधिकारी यांनी जखमी अवस्थेत ड्रग्स तस्कराच्या मुसक्या आवळल्या. स्टीफन सॅम्युअल टोनी असे अटक करण्यात आलेल्या या ड्रग तस्कराचे नाव आहे. त्याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता!

स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियात पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा आहे. अलिकडेच तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर ३० येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करीत त्याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त केले.

(हेही वाचा : होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!)

२०२१ मध्ये आतापर्यंत २२ परदेशी नागरिकांना अटक

एनसीबीवर काही महिन्यांपूर्वी बांगुर नगर मालाड, त्यानंतर अंधेरी आता नवी मुंबई येथे ड्रग्स तस्कराकडून हल्ला करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्‍यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली असून २०२१ मध्ये आतापर्यंत २२ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.