Naval Officers in Qatar : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची आश्वासक कृती; कुटुंबियांना भेटून म्हणाले, ‘ही’ समस्या सोडवणे हे सर्वोच्च प्राधान्य 

148
Naval Officers in Qatar : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची आश्वासक कृती; कुटुंबियांना भेटून म्हणाले, 'ही' समस्या सोडवणे हे सर्वोच्च प्राधान्य 
Naval Officers in Qatar : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची आश्वासक कृती; कुटुंबियांना भेटून म्हणाले, 'ही' समस्या सोडवणे हे सर्वोच्च प्राधान्य 

कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी भेट घेतली. (Naval Officers in Qatar) त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबियांना दिले. “सरकार या समस्येला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. या कुटुंबाची चिंता आणि त्यांची वेदना सरकारला समजते. त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील”, असे परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहे. (Naval Officers in Qatar)

कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना तिथल्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे सर्व अधिकारी तुरुंगात आहेत. त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत देण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे. भारत सरकारने कायदेशीर मदत आणि सुरक्षा यापूर्वीही पुरवली. परंतु तरीदेखील कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी केलेली नाही. (Naval Officers in Qatar)

(हेही वाचा – Fire News : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळ भीषण आग, १० बस जळून खाक)

या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांची कुटुंबे अत्यंत चिंतेत आहेत. या चिंताक्रांत कुटुंबियांची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भेट घेऊन त्यांना अधिकाऱ्यांच्या सुटकेचा विश्वास दिला. कतार सरकार बरोबर भारत सरकारच्या कायदेशीर पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. 8 नौदल अधिकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कायदेशीर मदत सल्ला मिळवून दिली जाईल, असा विश्वास जयशंकर यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना दिला. (Naval Officers in Qatar)

भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल हरीकुमार यांनी देखील असाच विश्वास व्यक्त केला. ‘भारतीय नौदल कतारमधल्या अधिकाऱ्यांच्या वकिलांच्या संपर्कात आहे. कतारच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी कतार नौदलाशी देखील संपर्क साधला आहे’, अशी माहिती हरिकुमार यांनी दिली.

पंतप्रधानांनी वैयक्तिक हस्तक्षेप करावा – कुटुंबियांची भावूक मागणी

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ जणांपैकी एक कमांडर पूर्णेंदू तिवारी (निवृत्त) यांची बहीण मितु भार्गव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांवर खटला कसा चालवला गेला, याबाबत पारदर्शकता नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास कमी झाला आहे. (Naval Officers in Qatar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.