अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून पाठवण्यावर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी दिले उत्तर

87
अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून पाठवण्यावर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी दिले उत्तर
अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून पाठवण्यावर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी दिले उत्तर

बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकांपैकी १०४ जणांना अमेरिकन (America) प्रशासनाने काल बुधवारी( ५ फेब्रुवारी ) एका विशेष लष्करी विमानातून भारतात परत पाठवले होते.मात्र अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar ) यांनी उत्तर दिलं आहे.

( हेही वाचा : Kerala मध्ये ८ वर्षात पोक्सोअंतर्गत ३१ हजाराहून अधिक गुन्हे दाखल; कम्युनिस्टांच्या सत्ताकाळात अल्वपयीन मुली असुरक्षित

अमेरिकेतून भारतीयांच्या परतण्यावरून संसदेत सुरू असलेला गोंधळ शांत करण्यासाठी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar ) यांनी राज्यसभेत उत्तर दिलंय. या सर्व भारतीयांना अमेरिकन हवाई दलाच्या विमानात असं बांधून का ठेवलं होतं, हे देखील स्पष्ट केलंय. एस जयशंकर (S. Jaishankar ) म्हणाले, आपले नागरिक जर परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे दिसून आले तर त्यांना परत आपल्याकडे घेणं ही सर्व देशांची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी (Customs Enforcement Authority) करते.

अमेरिकन प्रशासनाने भारतीय नागरिकांना हातपाय बांधून पाठवण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २०१२ पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा लोकांना विमानातून माघारी पाठवण्यात येतं, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधून ठेवण्यात येतं. दरम्यान, आयसीईने दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत महिला आणि मुलांना सवलत देत या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जातं. म्हणजेच त्यांना बांधून ठेवलं जात नाही. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांसोबत कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारसोबत सातत्याने चर्चा करत आहोत. अमृतसरमधील श्री गुरु रामदास (Shri Guru Ramdas) जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान उतरले. हद्दपार केलेल्या लोकांपैकी 30 जण पंजाबचे, 33 जण हरियाणा (Haryana) आणि गुजरातचे, प्रत्येकी ३३ जण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आणि दोन जण चंदीगडचे आहेत. हद्दपार केलेल्यांमध्ये 19 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यात एक चार वर्षांचा मुलगा आणि पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.