विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन, अश्लील भाषेत संवाद; DGCA कडे तक्रार

विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गो फर्स्टच्या प्रवाशांनी विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. प्रवाशाने एअर होस्टेसशी अश्लील भाषेत संवाज साधत तिच्याकडे अश्लील मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गो फर्स्टचे हे विमान गोव्याला जात होते. या दरम्यान ही घटना घडली.

( हेही वाचा : भारतीय संघाचा श्रीलंकेवर मोठा विजय! सूर्यकुमारचे शतक आणि टीम इंडियाचे रेकॉर्ड्स…)

एअर होस्टेससोबत गैरवर्तन

एअर होस्टेसला एका प्रवाशाने जवळ बसण्यास सांगितले तर दुसऱ्या प्रवाशाने बोलताना अश्लील भाषा वापरली. गो फर्स्टच्या विमानात ५ जानेवारीला ही घटना घडली. महिला फ्लाइट क्रूने याबाबत सीआयएसएफकडे तक्रार केली असून याबाबत संपूर्ण माहिती डीजीसीएला दिली आहे.

अलिकडे विमान प्रवासदरम्यान होणाऱ्या गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी एअर इंडिगोच्या एअर होस्टेससोबत एका प्रवाशाने गैरवर्तन केले होते. जेवणावरून प्रवासी आणि इंडिगो फ्लाइट अटेंडंट यांच्यात वाद झाला होता. जेवणासाठी योग्य पर्याय न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाल्याने हा वाद झाला. अशा वाढत्या घटनांमुळे विमानामध्ये सुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here