डिसेंबर महिन्यात हॅलिकॅप्टर स्फोटात मृत्यूमुखी पावलेले दिवंगत रक्षा दल प्रमुख बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अंदाजे साडेतीन महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याला आता बिपीन हे नाव मिळाले आहे.
डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात नंदुरबारहून अवघी सव्वा महिन्याची बिबट्याची दोन बछडी अतिशय चिंतानजक परिस्थितीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. या बिबट्यांच्या तब्येतीत सुधारणा होताच, एका बिबट्याला नंदन तर दुस-याला बिपीन हे नाव वनाधिका-यांनी दिले आहे.
(हेही वाचाः २५ वर्षे भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे!)
बछड्यांची तब्येत खालावलेली
नंदुरबार वनविभागातील मेवासी भागातील तळोदा परिक्षेत्रात आईपासून विभक्त झालेल्या तीन बछड्यांना मादी बिबट्या आईशी पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न वनविभागाने केला. परंतु मादी बिबट्या केवळ एकाच बछड्याला घेऊन गेली. दोन बछडी बरेच दिवस भुकेलेली असल्याने त्यांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने त्यांना मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले. दोघांनाही डायरिया झाला होता, वजनही फारच कमी होते. त्यामुळे त्यांच्या जगण्याची आशा फारच कमी होती.
पिंज-यात सोडण्यात आले
अशा परिस्थितीत बिबट्यांची उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात काळजी घेतली गेली. अखेर हे दोन्ही बछडे आता तब्येतीने सुदृढ झाल्याची माहिती उद्यानाचे व्याघ्र व सिंह सफारीचे वनपरिक्षेत्रपाल विजय बारब्धे यांनी दिली. त्यांना नुकतेच उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रातील मोठ्या पिंज-यात सोडण्यात आले आहे.
(हेही वाचाः ब्लॉक कॉलर म्हणजे काय…वाचा…)
कशी घेतली काळजी?
दोन्ही बिबट्याच्या बछड्यांसाठी प्राणीरक्षकासह पाच जणांची टीम तयार करण्यात आली. पशुवैद्यकीय रुग्णालयातील बिबट्यांच्या बछड्याच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमे-यातून वरिष्ठांकडून नजर ठेवली जात होती. प्राणीरक्षकांनी सुरुवातीला दूध नंतर चिकन सूप पाजायला सुरुवात केली. डिसेंबर महिन्याच्या शेवटी त्यांना आम्ही ७५ ग्रॅमचे चिकन खायला द्यायचो, अशी माहिती उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. आता ते दर दिवसाला २५० ग्रॅम चिकन फस्त करतात. दोघांचेही वजन आता ६ किलो झाल्याची माहिती डॉ पेठे यांनी दिली.
बछड्यांची काळजी घेणारी टीम
विजय बारब्धे, वनपरिक्षेत्रपाल, सिंह व व्याघ्र सफारी आणि प्रमुख , वन्यप्राणी बचाव पथक, डॉ शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ जसना नंबियार, मुकेश मोरे, प्राणीरक्षक, तुळशीराम शनवार, संजय बरफ, प्रशांत टोकरे, मयूर जिरवे.
(हेही वाचाः ब्लॉक कॉलर म्हणजे काय…वाचा…)
Join Our WhatsApp Community