महापालिका कबड्डीच्या माजी कर्णधार जयू राणे यांचे निधन!

जयू राणे मुंबई महानगरपालिका कबड्डी महिला संघाच्या कर्णधार होत्या.

मुंबई महानगरपालिकेच्या कबड्डी खेळाडू जयू राणे (पूनम पवार) यांचे बुधवारी, 21 एप्रिल रोजी पुणे येथील राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. जयू राणे या मुंबई महानगरपालिकेत कबड्डी खेळाडू म्हणून सेवेत दाखल झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका कबड्डी महिला संघाच्या कर्णधार होत्या, मुंबई महानगरपालिका महिला कबड्डी संघाने असंख्य अंतिम विजेतेपदके त्यांच्या नेतृत्वाखाली पटकावली होती. मुंबईत महापालिका कबड्डी संघाचा एक दबदबा होता.

(हेही वाचा : टाळी वाजवणा-यांना मिळाले मदतीचे ‘हात’, हिंदुस्थान पोस्टच्या वृत्ताने घडला चमत्कार!)

जयू राणे या काही वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प खात्यातून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाल्या होत्या. पूनम पवार यांचे मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी – अधिकारी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या सेवेत असताना कामगार क्षेत्रात कार्यरत होत्या. मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन कार्यकारिणीमध्ये मानद सचिव म्हणून अनेक वर्षे त्यांनी कामकाज केले होते. मुंबई महानगरपालिका स्थानीय लोकाधिकार समितीच्याही त्या क्रियाशील सदस्य होत्या. जयू राणे यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनातील सदस्य आणि सहकारी महापालिका कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here