आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे ३५० कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. याआधी गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना अटक वॉरंट बजावलं होतं.
हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचं सांगत चंद्रबाबू नायडू यांना जामिनावर सोडता येणार नाही, असं त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी नायडू यांना कलम 120 (8),166,167,418,420,465,471,409,201,109rw 34 आणि 37 आयपीसीअंतर्गत अटक केली. नंद्याल रेंजचे डीआजी रघुरामी रेड्डी आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा ताफा पहाटे 3 च्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये पोहोचला, मात्र तेथे टीडीपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी पोलिसांत तीव्र प्रतिकार केला. त्यांनी पहाटे 5.30 वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं नाही. शेवटी, सकाळी 6च्या सुमारास पोलिसांनी नायडू यांच्या वाहनाचे दरवाजे ठोठावले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
चंद्राबाबूंनीही आरोपांचे पुरावे न दाखवता अटकेची कारवाई सुरू केल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. पुरावे सादर केले तरच कायद्याला सहकार्य करू, असे चंद्राबाबू म्हणाले. नायडूंना अटक करण्यापूर्वी सीआयडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे आढळून आलेस असे नायडूंच्या वकिलाने सांगितले. आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करत असल्याचंही वकिलांनी सांगितलं.
Join Our WhatsApp Community