माजी गृहराज्यमंत्री तथा भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकर यांच्यावरील चित्रप्रदर्शनाला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने स्मारकात चित्रकार योगेंद्र पाटील यांनी वीर सावरकर यांच्या कार्याची ओळख करून देणारी चित्रे रेखाटली आहेत. त्या चित्रप्रदर्शनाला प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. त्याआधी माजी मंत्री शिंदे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ या मीडिया हाऊसला भेट दिली, त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या तर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
यावेळी माजी मंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात शिक्षा भोगलेल्या सेल्युलर जेलची प्रतिकृती पाहिली, तसेच वीर सावरकर यांनी सेल्युलर जेलमध्ये ओढलेल्या कोलूची प्रतिकृती स्मारकात ठेवली आहे तो कोलू ओढून प्रत्यक्ष अनुभव घेतला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर यांनी किती मोठा संघर्ष केला, याची प्रचिती घेतली. त्यांना देशाप्रती किती अभिमान होता, त्यांनी त्या कालखंडात किती प्रखर लढा दिला, याची या स्मारकात आल्यानंतर जाणीव झाली, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शिंदे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.
(हेही वाचा माजी गृहराज्य मंत्री राम शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट)
रायफल शुटींगचा अनुभव
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे चालविल्या जाणाऱ्या ‘रायफल शुटींग’ उपक्रमालाही प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. रायफल शुटिंगचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. वारंवार यावेसे वाटणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक हे मुंबईतील हक्काचे ठिकाण आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.
Join Our WhatsApp Community