पुणे जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी Mangaldas Bandal यांना ईडीकडून अटक

महंमदवाडी (ता. हवेली) येथील निवासस्थानी ईडीच्या दुसऱ्या पथकाने Mangaldas Bandal यांची चौकशी करून त्यांना अटक केली. या वेळी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली.

148
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी Mangaldas Bandal यांना ईडीकडून अटक
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी Mangaldas Bandal यांना ईडीकडून अटक

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) पथकाने एकाच वेळी छापे टाकले. शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, त्यांचे दोन भाऊ व इतर कुटुंबीयांची पथकाने १२ तास चौकशी केली. महंमदवाडी (ता. हवेली) येथील निवासस्थानी ईडीच्या दुसऱ्या पथकाने बांदल यांची चौकशी करून त्यांना अटक केली. या वेळी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली.

(हेही वाचा – Badlapur School Case : माझी पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी; Supriya Sule यांनी केली सरकारकडे मागणी)

बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबीयांच्या बँक लॉकरची तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. या छाप्यांमध्ये काही मुद्देमाल हस्तगत केल्याचेही सांगण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, माहिती देण्यास नकार दिला.

मनी लॉन्ड्रींगप्रकरणी यापूर्वी बांदल यांना ईडीने एक वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. चौकशीसाठी ते चार वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजरही राहिले होते. चौकशीला चांगले सहकार्य करीत होते. याशिवाय तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता.

काय आहे बांदल यांची पार्श्वभूमी ?

बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती. शिरुर विधानसभा मतदार संघातून बांदल निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. बांदल (Mangaldas Bandal) यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे सांगण्यात येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.