माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey निवडणुकीच्या मैदानात, थेट केली उमेदवारांची घोषणा

143
माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey निवडणुकीच्या मैदानात, थेट केली उमेदवारांची घोषणा
माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey निवडणुकीच्या मैदानात, थेट केली उमेदवारांची घोषणा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. संजय पांडे हे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक (maharashtra assembly election 2024) लढवणार आहेत. त्यांनी स्वतः चार उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आले होते. नाशिकमध्ये त्यांनी याविषयीची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)

संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटले होते. आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशी पोस्ट संजय पांडे यांनी केली होती.

त्यानंतर १९ जुलै रोजी त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) थेट उमेदवारांची घोषणा केली आहे. संजय पांडे म्हणाले की, आम्ही एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. मी स्वतः वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातून शामराव भोसले निवडणूक लढवणार आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माझी समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचणी सुरु असून त्याबद्दल देखील लवकरच घोषणा करण्यात येईल, असे संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.