Former US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, कारण…जाणून घ्या

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आले आहे.

206
Former US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, कारण...जाणून घ्या
Former US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, कारण...जाणून घ्या

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. मंगळवारी, कोलोरॅडो प्रांतातील प्रमुख न्यायालयाने यू. एस. कॅपिटल हिंसाचार प्रकरणांमध्ये ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले.

व्हाईट हाऊसचे प्रमुख रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांना न्यायालयाने राज्याच्या अध्यक्षपदासाठीच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आले आहे.

कोलोरॅडो उच्च न्यायालयाने ४-३च्या बहुमताने निर्णय दिला की, १४व्या दुरुस्तीच्या कलम ३अंतर्गत ट्रम्प अध्यक्षपदासाठी अयोग्य आहेत. कोलोरॅडो प्रांताच्या उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय उलटवला. जिल्हा न्यायालयाने म्हटले होते की, ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी जमावाला हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते, परंतु ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखता येणार नाही, कारण राज्यघटनेच्या कलमात राष्ट्रपतीपदाचा समावेश आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टता नाही.

(हेही वाचा – Israel Hamas Conflict: इस्रायलमध्ये गुगलचे ‘लाईव्ह ट्रॅफिक अॅप’ बंद, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग युद्धविरामाबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर)

समर्थकांकडून हिंसाचाराला आव्हान
२०२१च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना हार पत्करावी लागली. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी ६ जानेवारी २०२१ ला यूएस कॅपिटल (अमेरिकी संसद) हल्ला केला. त्यांचे हजारो समर्थकांनी संसद भवनाच्या इमारतीत घुसून प्रवेश केला. हिंसाचार आणि तोडफोड केली. या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी संसदेच्या इमारतीत प्रवेश करून हिंसाचाराला आव्हान दिल्याचा आरोप केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.