राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दरदिवसाला घट होत असताना बीए व्हेरीएंटचे नवे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बीए 5 चे 21 तर बीए 2.75 चे 216 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णनोंदीमुळे राज्यात आता बीए व्हेरिएंट 4 आणि 5 ची रुग्णसंख्या 369 आणि बीए 2.75 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 675 वर पोहोचली आहे.
( हेही वाचा : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार – मुख्यमंत्री )
राज्यात बीए 2.75 व्हेरिएंटचा मोठ्या प्रमाणात प्रसार
गेल्या ऑगस्ट महिन्यात 20 तारखेपासून आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांची जनूकीय चाचणी केली होती. 1 सप्टेंबरपर्यंत सुरु राहिलेल्या जणुकीय चाचणीत बीए व्हेरीएंटचे 21 तर बीए 2.75 चे 216 रुग्ण सापडले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बीए 2.75 व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत.
549 कोरोनाचे नवे रुग्ण
सोमवारी राज्यात 549 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. गेल्या 24 तासात 748 कोरोनाच्या रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97. 07 टक्क्यापर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आता केवळ 8 हजार 162 रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
Join Our WhatsApp Community