धर्मांधांनी तिला धमकावले आणि नंतर कुस्करले! 

देहूरोड पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी अरबाज जाविद खान, मुस्ताक सलीम सय्यद, सोहेल शेरअली पिरजादे, रियाज जावेद खान तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलासह चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरोधात कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आय.टी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज जाविद खान, मुस्ताक सलीम सय्यद, सोहेल शेरअली पिरजादे, रियाज जावेद खान तसेच दोन अल्पवयीन मुलांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अखेर तिने तक्रार केली!

पीडित युवती आणि आरोपींची गेल्या वर्षभरापासून मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचा फायदा घेत आरोपी मागील पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास आरोपी भाग पाडत होते. संबंधित आरोपींच्या त्रासाला कंटाळून तरुणीने ही बाब आपल्या नातेवाइकांना सांगितली. त्यानुसार पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांच्या गोठ्यात तसेच देहूरोड शहरातील स्मशानभूमी जवळ असलेल्या निर्जनस्थळी पीडित तरूणीवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. देहूरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाई करून आरोपींना गजाआड केले आहे, तर संबंधित प्रकरणातील पीडित तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

(हेही वाचा : शिवसेनेचे ‘ते’ सध्या काय करतात?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here