Organ Donor : चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता, पालकांचा कौतुकास्पद निर्णय

पालकांनी अवयवदानाचं सर्वात श्रेष्ठ काम केलं आहे. या अवयवदानाच्या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

134
Organ Donor : चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता, पालकांचा कौतुकास्पद निर्णय
Organ Donor : चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता, पालकांचा कौतुकास्पद निर्णय

अवयव दान हे सर्वात मोठे दान समजले जाते. आता याबात लोकांमध्ये जनजागृती करण्यात झाली आहे. सध्या एका चार दिवसांच्या बाळाने अवयवदान करत सहा जणांचे प्राण वाचवले आहेत. ब्रेन डेड झाल्यामुळं या बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या पालकांनी अवयवदानाचं सर्वात श्रेष्ठ काम केलं आहे. या अवयवदानाच्या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ( Organ Donor)

मानवी अवयव तयार करता येत नाहीत, त्यामुळं गरजवंतांला एखाद्या दात्याकडून अवयव मिळणं हे सर्वात मोठं दान समजलं जातं. पण अशाच प्रकारे केवळ चार दिवसांच्या बाळानं अवयवदान करत ६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळं या बाळाची भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता म्हणून नोंद झाली आहे.

गुजरातच्या सूरतमधील हे बाळ असून जन्मानंतर केवळ चारच दिवसात या बाळाचं दुर्देवी मृत्यू झाला. ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं, पण त्यानंतर १११ तासांत या नवजात बाळानं इतर सहा बालकांना नव जीवन दिलं आहे. दोन किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा सर्वात धाडसी निर्णय त्याच्या पालकांनी घेतला. या पालकांनी अतिशय अनुकरणीय असा निर्णय घेतला आहे. ( Organ Donor)

अवयवदानाच्या क्षेत्रात सूरत शहरानं अनेक गोष्टींसाठी चांगला पुढाकार घेतला आहे. पण आता ही नुकतीच घडलेली घटना एक विशेष आणि प्रेरणादायी बाब आहे. या बालकाचे पालक हे सूरतच्या वलक पाटीया इथले रहिवासी आहेत. मूळचे ते अमरेली येथील आहेत. जन्म झाल्यापासून बाळ रडत नव्हतं तसेच त्याची हालचालही होत नव्हती. यानंतर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यांनी अखेर आपल्या बाळाचे अवयव इतर गरजू बाळांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा : Sunil Tatkare On Jayant Patil : संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते; सुनिल तटकरेंचा जयंत पाटील यांना खोचक टोला)

नेमके काय झालं
१३ ऑक्टोबर रोजी हर्षभाई आणि चेनबेन संघानी या दाम्पत्याला बाळ झालं. पण जन्मापासूनच हे बाळ इतर नवजात बाळांप्रमाणं नव्हतं. बाळाची कसलीच हालचाल होत नव्हती तसेच ते रडतही नव्हतं.यानंतर या बाळाच्या अनेक तपासण्या करण्याचं ठरलं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन विशेष वैद्यकीय ट्रिटमेंट दिली गेली, कारण ते बरं होऊ शकेल. पण बाळाच्या मेंदूच्या काही चाचण्या केल्यानंतर हे स्पष्ट झालं की, बाळ ब्रेनडेड झालं आहे. पण केवळ पाच दिवस जगू शकलेल्या आपल्या बाळामुळं इतर सहा बाळांना नवजीवन मिळू शकतं हे कळाल्यानंतर त्यांनी बाळाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.